अंबाझरीतील ‘हश हेज कॅे’वर पाेलिसांचा छापा

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
- मालक, मॅनेजरसह चाैघांवर गुन्हा दाखल
 
अनिल कांबळे
नागपूर, 
अंबाझरी पाेलिसांनी गाेकुळपेठ परिसरातील एका कॅेवर धाड टाकून Illegal Hookah Parlor अवैध हुक्का पार्लरचा प्रकार उघडकीस आणला. कारवाईत पाेलिसांनी कॅेच्या मालकासह चाैघांवर गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार, गाेकुळपेठ मेन राेडवरील लक्ष्मीक्षा इमारतीत असलेल्या ‘हश हेज कॅे’मध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. या माहितीवरून पाेलिसांनी पाेलिसांनी रविवारी पहाटेपूर्वी 1 वाजताच्या सुमारास येथे छापा टाकला.
 

hukka 
 (संग्रहित छायाचित्र )
 
कारवाई दरम्यान, कॅेचा मॅनेजर चंदन करनसिंग जयगडी (23, कपिलनगर) हा आपले सहकारी अरहान अहमद अश्पाक अहमद (19, जाफरनगर) आणि तक्षक युवराज भवरे (20, कपिलनगर) यांच्या मदतीने 4 ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरविताना पकडण्यात आले. हे सर्वजण कॅे मालक तेजस संजय सरदार (28, पाटणकर चाैक) याच्या सांगण्यावरून आर्थिक ायद्यासाठी हा अवैध व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाेलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पाॅट, विविध फफ्लेवर्सची तंबाखू आणि इतर साहित्य असा एकूण 9 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अंबाझरी पाेलिस ठाण्यात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कॅे मालक तेजस सरदार हा फरार असून पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत.
 
 
कॅेच्या नावावर हुक्का पार्लर
शहरात अनेक ठिकाणी कॅेच्या नावावर अवैधरित्या हुक्का पार्लर चालविल्या जातात. अंबाझरी, सीताबर्डी,धंताेली, बजाजनगर आणि प्रतापनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत चाेरुन सुरु असलेल्या Illegal Hookah Parlor  हुक्का पार्लरमध्ये अल्पवयीन मुलींचीसुद्धा गर्दी नेहमी असते. अशाच हुक्का पार्लरमधून ड्रग्जसुद्धा विक्री आणि तस्करी केल्या जात असल्याची माहिती आहे. हुक्का पार्लर संचालकांची पाेलिसांसाेबत ‘अर्थपूर्ण’ संबंध असतात, अशी चर्चा आहे.