इस्त्रायलला जोरदार धक्का! १६ मुस्लिम देशांची ताकद एकवटली

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
दोहा,
israel-vs-arab-country : इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी हालचाल दिसून येत आहे. तब्बल १६ मुस्लिम देशांनी एकत्र येत इस्त्रायलच्या काही निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १८ एप्रिल २०२६ रोजी दोहा येथे झालेल्या बैठकीत या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करून इस्त्रायलच्या भूमिकेचा निषेध केला.
 
 
 
war
 
या देशांनी विशेषतः सोमालीलँडला सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या इस्त्रायलच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, हा निर्णय सोमालियाच्या सार्वभौमत्वावर आघात करणारा आहे. त्यामुळे ही कारवाई योग्य नसून आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
अल्जेरिया, इजिप्त, सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, लिबिया, ओमान, सुदान, येमेन, पॅलेस्टाईन यांसह एकूण १६ देशांनी या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यांनी सोमालियामध्ये इस्त्रायलच्या राजनैतिक हालचालींनाही अवैध ठरवत ही एकतर्फी कृती असल्याचे म्हटले.
 
या सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला सोमालियाच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इराण-अमेरिका संघर्षामुळे आधीच जागतिक तणाव वाढलेला असताना, या घडामोडींमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.