जगदंबा अभियांत्रिकीत पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा थाटात

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
यवतमाळ, 
Jagdamba Engineering जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह थाटात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे मीनल मालधुरे (उपनिबंधक, पीएचडी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ), अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात, सचिव डॉ. शितल वातीले, प्राचार्य डॉ. प्रवीण डाखोळे, उपप्राचार्य डॉ. विजय आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
 
 
pramanpatra
 
प्रमुख पाहुण्या मीनल मालधुरे म्हणाल्या, फक्त आई-वडिलांची इच्छा म्हणून शिकायचे नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून आपले करियर घडवा. जेणेकरून आपली व आई-वडिलांची आणि आपल्या देशाची प्रगती होईल. अशोक थोरात, अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर सेवा व राज्य सेवासार‘या स्पर्धा परीक्षांची तयारी करा. अनेक प्रशासकीय पदांवर इंजिनीयर झालेल्या व्यक्तीची निवड झाली तर प्रशासनात गतिमानता येऊन तांत्रिक ज्ञानाची जोड मिळेल व भविष्यात विकसित भारत बनन्यास तुमचा हातभार लागेल.
 
 
Jagdamba Engineering  उपप्राचार्य डॉ. विजय भांबेरे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी काळानुरुप स्वतःमध्ये बदल कराल तरच या स्पर्धात्मक युगात तुमचा लागेल. प्रामुख्याने सध्या प्रचलित आर्टीफिशल इंटेलिजन्स (एआय), डाटा सायन्स, मशिन लर्निंग यांसार‘या क्षेत्राचे ज्ञान आत्मसात करुन पुढील वाटचाल करावी. संस्थासचिव डॉ. शितल वातीले यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयातर्फे नामांकित कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. अमरावती विद्यापीठाने यावर्षी जाहीर केलेल्या अभियांत्रिकीच्या गुणवत्ता यादीत अभियांत्रिकीच्या ५ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून मेरीटची परंपरा राखली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व विकासासाठी संस्था सदैव प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक‘म राबवल्याची प्रतिकि‘या माजी विद्यार्थ्यांनी दिली. संचालन व आभारप्रदर्शन प्रा. स्नेहा खोडके यांनी केले.