केकेआरला दिलासा; धाकडं खेळाडूचे संघात पुनरागमन

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये संघर्ष करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना अखेर संघात सामील झाला आहे. फ्रँचायझीकडून याची अधिकृत पुष्टी करण्यात आली असून, त्याच्या आगमनामुळे संघाच्या गोलंदाजीला मोठे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
 
 

kkr 
 
 
टी-२० विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो काही काळ मैदानाबाहेर होता. मात्र आता पूर्णपणे तंदुरुस्त होत त्याने श्रीलंका क्रिकेटची आवश्यक फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. त्याला ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ मिळाल्यानंतर तो थेट कोलकाता नाइट रायडर्स संघात दाखल झाला आहे.
 
तथापि, तो लगेचच अंतिम ११ मध्ये खेळेल की नाही याबाबत अजून निश्चितता नाही. संघ व्यवस्थापन त्याची पूर्ण तंदुरुस्ती तपासून काही सराव सत्रांनंतरच अंतिम निर्णय घेणार आहे.
 
पाथिरानाला आयपीएल लिलावात मोठ्या रकमेत संघाने घेतले होते. त्याची वेगळी गोलंदाजी शैली आणि शेवटच्या षटकांमध्ये अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता यामुळे तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. सध्या दबावाखाली असलेल्या गोलंदाजी विभागाला त्याच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.