- दुसरा बिबटही जेरबंद : वन विभाग व शीघ्र बचाव दलाची संयुक्त कारवाई
अर्जुनी मोरगाव,
तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन leopard captured बिबट्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यातील एका बिबट्याला जेरबंद केल्यानंतर दुसर्या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, रविवारी १९ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास वन विभाग व शीघ्र बचाव पथकाने संयुक्त कारवाई करत दुसर्या बिबट्यालाही जेरबंद करून विबट्याच्या दहशतीला पुर्णविराम लावले आहे.
leopard captured धाबेटेकडी /आदर्श परिसर जंगल शिवाराला लागून असून गेलया आठवड्यात १० एप्रिल रोजी एका बिबट्याने सहा वर्षीय बालकाला घराच्या अंगणातून उचलून नेत ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर वन विभागाने परिसरात पिंजरे लावून १४ एप्रिल रोजी त्या बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र, दुसर्याच दिवशी पुन्हा एका बिबट्याचे दर्शन गावकर्यांना झाले. त्यामुळे गावकर्यांमध्ये बिबट्याची दहशत कायम होती. दरम्यान, वन विभागाकडून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. अखेर गावकर्यांच्या सहकार्याने आणि वन विभागाच्या सतर्कतेमुळे रविवारी पहाटे या दुसर्या बिबट्यालाही जेरबंद करण्यात यश आले. ही कारवाई उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग तसेच नवेगाव-बांध येथील प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली व अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्रसिंग बहुरे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक प्रवीण केलवतकर, वनरक्षक सतीश शेंद्रे, अमित राऊत, पुरुषोत्तम पटले यांच्यासह शीघ्र बचाव दलाच्या सदस्यांनी केली.