-भगवान परशुराम जयंतीनिमित्त स्कुटर रॅली
-अ. भा. ब्राह्मण महासंघाचे आयोजन
नागपूर,
Lord Parashurama Jayanti: Scooter Rally भगवान श्री परशुराम जयंती व अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित रॅली उत्साह व जल्लोेषात पार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीची सुरुवात आग्याराम देवी मंदिरात आ. प्रवीण दटके यांच्या हस्ते भगवान परशुरामाच्या पूजनाने झाली. यावेळी नगरसेविका धनश्री देशपांडे, महासंघाचे अध्यक्ष पराग जोशी, सरचिटणीस जय पाठक, संयोजक तुषार पिदडी, श्रद्धा पाठक उपस्थित होते. भगवान परशुरामाची भव्य प्रतिमा आकर्षक रथावर विराजमान होती. वाढत्या तापमानावर मात करत गजरात, टाळकरी व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने रॅलीला धार्मिक व सांस्कृतिक रंग चढला. मार्गातील चौका-चौकात नागरिकांनी पुष्पवृष्टी करत रॅलीचे स्वागत केले. जय परशुरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या सं‘येने सहभाग नोंदविला.
आग्याराम देवी मंदिरातून निघालेली रॅली दत्त मंदिर, गणेश मंदिर, थाडेश्वरी राम मंदिर, छत्रपती महाराज चौक, चिटणीस पार्क चौक, अयाचित मंदिर, झेंडा चौक, एस.डी. हॉस्पिटल, संगम टॉकिज, गजानन चौक, रेशीमबाग केशव प्रवेश द्वार, सिरसपेठ चौक, मशाल चौक या मार्गांने हनुमाननगरातील मैदानात रॅलीचा समारोप झाला. भाजप महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, देवेन दस्तुरे, संजय चिंचोले, महासंघाचे राष्ट्रीय महासचिव आशुतोष गोटे, नगरसेविका मंगला म्हस्के व इतर उपस्थित होते.
Lord Parashurama Jayanti: Scooter Rally सुरुवात शंखनाद व परशुराम पूजनाने झाली. भगवान परशुरामाची आरती करण्यात आली. दयाशंकर तिवारी यांनी रॅलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. ब्राह्मण समाजातील संस्कार, वेळेचे महत्त्व व समाजोन्नतीसाठी बांधिलकी यावर त्यांनी भाष्य केले. समाजातील एकजूट टिकवण्याचे आवाहनही त्यांनी केले. शैलेश मुठाळ, राहुल जोशी, अनुप उंबरकर, रेणुका बडगे, अयाचित, पल्लवी नाकाडे, अमित शिगरे, मोहन लेहगावकर, सुधीर सगोळे, प्रांजली मोहाने, अजय राजकारणे आदींनी रॅलीसाठी परिश्रम घेतले.