शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची ८९५ व्या जयंती निमित्त पूजन मोटार सायकल रॅली

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
Mahatma Basaveshwara Jayanti शिवा संघटनेच्या वतीने बुलडाणा नगरीत क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त दि. १९ एप्रिल रोजी अभूतपूर्व, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक सोहळा दिमाखात संपन्न झाला सकाळी ९.०० वाजता महात्मा बसवेश्वरांच्या पवित्र पुतळ्याचे ज्येष्ठ पत्रकार तथा शिवा संघटना जिल्हा मार्गदर्शक विश्वंभर वाघमारे, प्रा.डॉ नवलाखे व प्रबोधन विद्यालयाचे मुख्याध्यापक चिम यांचे हस्ते विधिवत पूजन करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली.
 
 
baseshwar
 
Mahatma Basaveshwara Jayanti  बुलडाणा शहरात मोटारसायकल रॅलीने शहर दुमदुमले जय शिवा, हर हर महादेव, महात्मा बसवेश्वर महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण भारावून गेले. हातात महात्मा बसवेश्वर आणि शिवा संघटनेचा विचारांची पताका आणि हृदयात परिवर्तनाची ज्वाला घेऊन युवकांनी शहरभर जनजागृतीची केली.महिला शक्तीनेही भक्ती, संस्कार आणि समर्पणाचा अद्वितीय संगम साकारत भजनाच्या माध्यमातून वातावरण भक्तिमय केले. बस स्थानक परिसरातील महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन पुरुषोत्तम आप्पा कुल्ली व अमोलआप्पा रेंगे व बस स्थानक कंट्रोलर पवार यांचे हस्ते करून समाजाने आपल्या आदर्शांप्रती असलेली अढळ निष्ठा पुन्हा दृढ केली.या ऐतिहासिक सोहळ्याला शिवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, निलाबिंका वीरशैव लिंगायत महिला मंडळ, तसेच वीरशैव लिंगायत समाजातील माता-भगिनी बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या आदेशानुसार बुलडाणा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा म्हणून सिंधु सरजने यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.