विद्यार्थ्यांना ‘ब्लाइंड डिसिजन’ची सक्ती

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
- एमएचटी-सीईटी प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा संताप

नागपूर, 
महाराष्ट्रातील विविध शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या MHT-CET Exam  एमएचटी-सीईटी परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनपेक्षित बदलांमुळे राज्यभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी प्रथमच परीक्षा ‘सत्र १’ आणि ‘सत्र २’ अशा दोन टप्प्यांत घेतली जात असताना, सत्र १ ची परीक्षा सुरू असतानाच सत्र २ साठीची नोंदणी १६ एप्रिल रोजी बंद करण्यात आली.
 
 
mht
सत्र १ च्या परीक्षा ११ ते २० एप्रिलदरम्यान सुरू असतानाच नोंदणी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याआधीच सत्र २ देण्याचा निर्णय घ्यावा लागला. केंद्रीय प्रवेश प्रक्रिये (कॅप) अंतर्गत दोन्ही सत्रांतील सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जाणार असले तरी, निकाल जाहीर होण्यापूर्वी निर्णय घ्यावा लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि मानसिक ताण वाढला आहे.
MHT-CET Exam  सत्र २ साठीचे अर्ज शुल्क १ हजार ३०० रुपये असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अनिश्चिततेमुळे अर्ज करणे टाळले. विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरली आहे. “निकालानंतर नोंदणी खुली ठेवली असती, तर अधिक योग्य निर्णय घेता आला असता, सध्या आम्ही ‘ब्लाइंड डिसिजन’ घेण्यास भाग पाडण्यात आले आहे” अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, हेल्पलाइनकडून मिळणाऱ्या अपुऱ्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया ‘अन्यायकारक’ आणि ‘अव्यावहारिक’ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
MHT-CET Exam  एमएचटी-सीईटी ही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा असून, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी ती महत्त्वाची मानली जाते. मात्र, यंदाच्या नियोजनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.