- व्यावसायिकाला सायबर गुन्हेगारांचा गंडा
अनिल कांबळे
नागपूर,
Money fraud सक्करदरा परिसरातील एका व्यावसायिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून माेठा ना मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी तब्बल 19.20 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पीडित व्यावसायिक विजय काळे यांनी सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय काळे यांचे चप्पल व जाेडे विक्रीचे दुकान असून 17 ेब्रुवारी राेजी त्यांच्या माेबाईलवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसंदर्भात एक मॅसेज आला. यामध्ये कमी कालावधीत अधिक ना मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले हाेते. त्यानंतर त्यांना एका व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये जाेडण्यात आले. या ग्रुपमध्ये सुमारे 150 सदस्य आधीपासूनच सक्रिय हाेते.
Money fraud ग्रुपमध्ये काही सदस्यांनी ट्रेडिंगमधून माेठा ना झाल्याचे स्क्रीनशाॅट शेअर करून विश्वास निर्माण केला. यामुळे विजय काळे यांचा विश्वास बसला. 10 मार्चपासून त्यांनी गुंतवणुकीबाबत विचारणा केली असता, आराेपींनी त्यांना एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करून दिलेला काेड टाकल्यानंतर एक वेबपेज उघडले, मात्र ते व्यवस्थित कार्यरत नव्हते. त्यानंतर कस्टमर केअरच्या नावाखाली चॅटिंगद्वारे त्यांना पैसे भरण्यास सांगितले. यानंतर आराेपींनी विविध खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले तसेच काेणत्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करायची याबाबत मार्गदर्शन केल्याचे भासवले. अशा प्रकारे विश्वासात घेऊन त्यांनी वेळाेवेळी विजय काळे यांच्या बँक खात्यातून एकूण 19.20 लाख रुपये उकळले. नंतर आणखी पैशांची मागणी हाेऊ लागल्यावर विजय यांना संशय आला आणि आपण फसवणुकीला बळी पडलाे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पाेलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून पुढील तपास सुरू केला आहे.