मुकुटबन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
समाधान शिबिरात ३१०२ प्रकरणे निकाली

झरीजामणी, 
Mukutban: 'Maharajaswa' solution तालुक्यातील मुकुटबन येथील हिमांशू सेलिब्रेशन हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पार पडले. यात प्रामुख्यायाने वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, तहसीलदार अक्षय रासने, निवासी नायब तहसीलदार प्रीतम राजगडकर यांची प्रमुख उपस्थित होते.
 
 
shivir
 
सकाळी १० ते ५ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. शिबिरात अनेक विभागातील कर्मचार्‍यांनी त्यांच्या विभागामार्फत शासनाच्या योजनांची माहिती गरजू व वंचित लाभार्थ्यांना दिली. कृषी विभाग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वनविभाग, आरोग्य विभाग, बँक विभाग, भूमी अभिलेख, सेतू विभाग, शिक्षण विभाग, उमेद विभाग, संजय गांधी निराधार विभाग, सहकारी संस्था, पशूधन विभाग, कामगार विभाग, एकात्मिक आदिवासी विभाग, अन्नपुरवठा विभाग, निराधार योजना विभाग, पोस्ट विभाग, परिवहन विभाग, शिक्षण विभाग व इतर विभागांचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते.
 
 
Mukutban: 'Maharajaswa' solution  या महाराजस्व अभियानामध्ये मुकुटबन सर्कलमधील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या सं‘येने सहभागी झाले होते यामध्ये ३१०२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. लोकप्रतिनिधी व कर्मचार्‍यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले, या कार्यक‘माचे आयोजन अधिकारी सुभाष खैरे यांनी केले होते. तलाठी मोबीन सिद्दीकी, दामोधर इटणकर, मनीषा बरशेट्टीवार, नीलम प्रांजळे, मोनिका सोमाशेट्टीवार, महसूल सेवक लाला कांबळे, गजानन डायकी, नयन केळझरकर, तिरणकार यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले.