पुणे,
Pune truck fire मुंबई–बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वारजे परिसरात रविवारी सकाळी मालवाहू टेम्पोला अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला असून त्यामध्ये असलेले परदेशी बनावटीचे महागडे फर्निचरही भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून फर्निचर घेऊन पुण्याच्या दिशेने येणारा टेम्पो सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास वारजे पुलाजवळील सेवा रस्त्यावरून जात असताना अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण टेम्पोला वेढा घातला. आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेतले आणि तत्काळ बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला.
घटनेची माहिती मिळताच पुणे Pune truck fire अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत टेम्पो आणि त्यातील माल पूर्णपणे जळून खाक झाला होता.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस व अग्निशमन दलाकडून पुढील तपास सुरू आहे.या दुर्घटनेमुळे काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.