मुंदडा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
मालेगाव,
Mundada School: Alumni get-together ना. ना. मुंदडा विद्यालय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव येथील दहावी २००१- २००२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा बालपण जगू या या भावनेतून शालेय आठवणींना उजाळा दिला.
Mundada School: Alumni get-together या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनेश उंटवाल तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष मुंदडा हे होते. निवृत्त प्राचार्य अघमकर, वसंतराव अवचार, संस्थेचे संचालक अभिषेक मुंदडा, पडघान, सारडा, गुडदे, कुबडे, रोडे, नेरकर मॅडम, मुंदडा मॅडम, काटेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. यानंतर उपस्थित सर्व शिक्षक व उपस्थित मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणार्या गुरुजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांचे डोळे पाणावले. एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले. अनेक वर्षांनी भेट झाल्यामुळे सर्वांच्या चेहर्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते. शिक्षकांसोबत घडलेले प्रसंग, मित्रांसोबत घालवलेले क्षण आणि त्या काळातील अनुभवांची रंगतदार आठवण त्यांनी एकमेकांशी शेअर केली. शाळेतून मिळालेले शिक्षण आणि संस्कार यांनी आयुष्याला योग्य दिशा दिली, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.