तृणमूलने केला महिलांचा विश्वासघात

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
कोलकाता
Narendra Modi, संविधान विधेयक (131 वी दुरुस्ती)-2026 मंजूर होण्यापासून रोखून तृणमूल काँग्रेसने महिलांचा विश्वासघात केला, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. विधानसभा निवडणुकीत महिला बंगालमधील सत्ताधारी पक्षाला निश्चितपणे शिक्ष करतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Narendra Modi, Trinamool Congress, Mamata Banerjee 
बांकुरा जिल्ह्यातील बिष्णुपूर येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूलवर जोरदार टीका केली. संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये 2029 पूर्वी 33 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करणाèया विधेयकाला या पक्षाने केलेल्या विरोधाच्या मुद्यावरून त्यांनी टीका केली. भाजपासाठी हा एक धक्का किंवा अपयश म्हणून पाहिले जात होते. त्याचे रूपांतर बंगालमध्ये एका भावनिक प्रचार मुद्यात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विशेषतः अशा राज्यात जिथे महिला मतदार आणि कल्याणकारी योजनांचे लाभार्थी हाच निवडणुकीच्या निकालावर निर्णायक प्रभाव टाकणारा सर्वांत महत्त्वाचा मतदारगट म्हणून समोर आला आहे.
महिला तृणमूल Narendra Modi काँग्रेसच्या महाजंगलराजला आव्हान देत असल्याने सत्ताधारी पक्षाने महिलांचा विश्वासघात केला, असे मोदी यांनी तृणमूल काँग्रेसला बचावात्मक पवित्र्यात लोटण्याच्या उद्देशाने सांगितले. महिला सशक्त व्हाव्यात त्यांना आरक्षण मिळावे, अशी तृणमूल काँग्रेसला इच्छा नाही. बंगालमधील महिला मोठ्या संख्येने खासदार आणि आमदार बनू नयेत असे त्यांना वाटते. कारण, या राज्यातील महिला त्यांच्या महाजंगलराजला आव्हान देत आहेत. म्हणूनच त्यांनी काँग्रेसशी संगनमत करून या विधेयकाला विरोध केला. या निवडणुकीत बंगालमधील महिला तृणमूल काँग्रेसला नक्कीच धडा शिकवतील, असे मोदी म्हणाले.
 
 
भाजपाची ओळख महिला सक्षमीकरणाशी जुळलेलीभाजपाची ओळख ही महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेशी जोडलेली आहे. विकसित भारताच्या उभारणीमध्ये मुलींची भूमिका विस्तारली जावी आणि अधिकाधिक मुलींनी राजकारणात प्रवेश करावा, अशी आमची इच्छा आहे. परंतु, संसदेत काय घडले हे तुम्ही पाहिलेच आहे. तृणमूलने बंगालमधील भगिनींचा पुन्हा एकदा विश्वासघात केला आहे, असे ते म्हणाले.