दगडूशेठला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य! VIDEO

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
पुणे,
dagdusheth-temple : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे भाविकांसाठी खास आकर्षण पाहायला मिळाले. या दिवशी गणरायाला तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात गर्दी करत दर्शन घेतले.
 
 
 
dagdusheth-temple
 
 
मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध आंबा व्यापाऱ्यांनी गणपती बाप्पाला आंब्यांचा नैवेद्य अर्पण केला. पहाटे लवकर अभिषेक आणि पूजाविधी पार पडले, तर त्यानंतर भक्तिगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तिमय झाले.
 
दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. गणेशयागासह इतर पूजा करण्यात आल्या. विशेष म्हणजे, अर्पण करण्यात आलेल्या आंब्यांचा प्रसाद गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयातील रुग्ण, अनाथ मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांना हा प्रसाद वाटला जाणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अक्षय तृतीया अधिक मंगलमय साजरी करण्यात आली.
 
 
 
 
 
सौजन्य: सोशल मीडिया