इस्लामाबाद,
Pakistan farmers protest पाकिस्तानात कॉर्पोरेट शेतीविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची धग देशाच्या शंभर शहरापर्यंत पोहोचली. सरकारने शेतकरीविरोधी कायदा रद्द करावा या मागणीसाठी शनिवारी लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी महामार्ग रोखून धरत पंतप्रधान शाहबाज शरीफविरोधात निदर्शने केली. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
पाकिस्तान किसान राबता समितीने (पीकेआरसी) या आंदोलनाचे आयोजन केले. या आंदोलनादरम्यान, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी कायद्यात तत्काळ सुधारणांची मागणी केली. या आंदोलनादरम्यान, शेतकèयांनी सरकारच्या कॉर्पोरेट शेतीच्या मॉडेलवर तीव्र टीका केली आणि नवीन कायदा तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. याशिवाय गव्हाची किमान आधारभूत किंमत 4,000 पाकिस्तानी रुपये प्रति मण निश्चित करण्याची मागणी केली. आंदोलकांनी 11 खाजगी कंपन्यांना गहू खरेदीचे काम आउटसोर्स करण्याच्या सरकारच्या योजनेला विरोध केला. शेतकèयांचे आंदोलन पंजाब प्रांतात तीव्र होते. शेतकèयांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये लाहोर, मुलतान, बहावलपूर, साहिवाल आणि सरगोधा यांचा समावेश होता.
इस्लामाबादला घेराव घालण्याचा इशारा
बलुचिस्तानमधील क्वेटा, मस्तंग आणि कलात येथेही आंदोलने सुरू आहे. या आंदोलनांमुळे शेतकèयांमध्ये देशभरात वाढत असलेली एकजूट दिसून आली. मागण्या पूर्ण न झाल्यास राजधानी इस्लामाबादला घेराव घालण्याचा इशारा शेतकèयांनी दिला. पीकेआरसीचे सरचिटणीस रिफत मकसूद यांनी शाहबाज यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्यांचा दोन वर्षांका कार्यकाळ शेतकèयांचे नुकसान करणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक हिंसक होऊ शकतात.