१० पेक्षा अधिक हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
काजळसरा येथे पोलिसांवर हल्ला प्रकरण
 
वर्धा, 
Police attack case देवळी तालुयातील काजळसरा येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणात देवळी पोलिसांनी दहा पेक्षा अधिक व्यतींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
fir
 
Police attack case १५ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस पथक काजळसरा येथे पोहोचले होते. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. पोलिस वाहनांची काचा फोडण्यात आली, पोलिस कर्मचार्‍यांशी धकाबुकी करण्यात आली तसेच शासकीय कामात अडथळा आणण्यात आला. या घटनेत काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. या संपूर्ण प्रकरणात देवळी पोलिसांनी राहुल शंभरकर, वंश म्हैसकर, आयुष वाघाडे, कुणाल वाघाडे, अंकुश निखाडे, सागर पायघन, ऋषिकेश वाघमारे, नंदा म्हैसकर, माधुरी दुधे (सर्व रा. काजळसरा) तसेच अभिजीत जीवने (रा. सावंगी मेघे) यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या गावातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास देवळी पोलीस करत आहेत.