Ralegaon: Human trafficking शनिवारी संध्याकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल चौहान यांनी राळेगाव पोलिस ठाण्यात येऊन राळेगावातून मानवी तस्करी होत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हेसुद्धा होते. या आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी सादर केलेल्या माहितीने राळेगाव परिसर हादरून आहे. या संदर्भात राळेगाव, केळापूर, मोहदा, वडकी, कळंब या परिसरातून जवळपास ३४ हिंदू मुली, ज्यापैकी बर्याच अल्पवयीन आहेत, बेपत्ता झाल्या आहेत. यामागे मानवी तस्करी करणारी टोळी कार्यरत आहे. त्यांनी या मुली देहविक‘य किंवा अन्य अनैतिक कामांसाठी विकल्या असाव्या, असा आरोप त्यांनी केला.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि प्रफुल्ल चौहान यांनी त्यापूर्वी अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांचीही भेट घेऊन संबंधित घटनांची कल्पना त्यांना दिली होती. त्यानुसार पोलिस चक‘ फिरू लागली आणि मजहर कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. भाजपा जिल्हाध्यक्षांनी पोलिसांकडे सादर केलेली ऑडिओ क्लिप ही एक वर्ष जुनी असून या घटनेची तिचा संबंध नाही असे सांगितले जाते. शिवाय पिंपरी दुर्ग येथील बालविवाहाचासुद्धा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. या घटनेसंदर्भात पोलिसांना अजून कोणतेही धागेदोरे गवसले नसून चौकशी सुरू आहे. अजूनपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी या चर्चेमुळे राळेगाव परिसरात प्रचंड खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले