रंगभूमी कलावंतांच्या हक्कासाठी ‘समांतर’ व्यासपीठ

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
‘समांतर रंगभूमी कलावंत संघटने’ची स्थापना

नागपूर, 
Rangbhumi kalavant :‘samantar’ vyaspith समांतर, प्रायाेगिक आणि हाैशी रंगभूमीवर कार्य करणाऱ्या  कलावंतांसाठी ‘समांतर रंगभूमी कलावंत संघटना’ स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून नाट्यकलावंतांच्या न्याय हक्कांसाठी संघटित आणि कायदेशीर पातळीवर आवाज उठवण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
 
 
kala
 
Rangbhumi kalavant :‘samantar’ vyaspith  शासनाच्या विविध स्पर्धा, अनुदान याेजना, सांस्कृतिक महाेत्सव आणि निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, निर्णय प्रक्रियेतील अस्पष्टता तसेच कलावंतांवर हाेणारा अन्याय याविराेधात ठाेस भूमिका घेण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या काही परिषद व संस्था धर्मादाय अंतर्गत नाेंदणीकृत असल्यामुळे त्यांच्या कार्यावर कायदेशीर मर्यादा येत हाेत्या. परिणामी कलावंतांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभा करण्यास अडचणी निर्माण हाेत हाेत्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील हाैशी नाट्यकलावंतांची स्वतंत्र, सक्षम आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम संघटना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या संघटनेच्या माध्यमातून कलावंतांचे संघटन, शासन याेजनांमध्ये पारदर्शकता, स्पर्धा व महाेत्सवांतील न्याय्य प्रक्रिया आणि कलावंतांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संघटनेर्ते सांगण्यात आले.
 
 
Rangbhumi kalavant :‘samantar’ vyaspith  राज्यातील विविध भागांतील पदाधिकाèयांचा सहभाग असल्यामुळे ही संघटना राज्यस्तरावर कार्यरत राहणार आहे. संघटनेच्या स्थापनेमुळे समांतर, प्रायाेगिक आणि हाैशी रंगभूमीवरील कलावंतांना एक सक्षम, एकजुटीचे आणि कायदेशीर व्यासपीठ मिळाल्याची भावना नाट्यकलावंतांनी व्यक्त केली आहे.
 
 
संघटनेची कार्यकारिणी
अध्यक्ष - डाॅ. श्याम शिंदे (अहिल्यानगर)
सचिव - दिनेश कवडे (नांदेड)
उपाध्यक्ष(प्रशासकीय) - संजय भाकरे (नागपूर)
उपाध्यक्ष(उपक्रम) - अरुण कदम (मुंबई)
सह सचिव - सागर लाेधी (पुणे)
काेषाध्यक्ष - विक्रम गवांदे (नाशिक)
संघटक - विजय चव्हाण (सिंधुदुर्ग)
संघटक - अशाेक हंडाेरे (कल्याण)
सदस्य - डाॅ. मीरा शेंडगे (साेलापूर)
सदस्य - किरण लाेंढे (साेलापूर)
सदस्य - डाॅ. गणेश शिंदे (धाराशिव)