रामनगर राम मंदिरात धर्मध्वजाची विधिवत स्थापना

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Ramnagar Ram Temple रामनगर येथील राम मंदिरात अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम जयंतीच्या शुभमुहूर्तावर धर्मध्वजाची विधिवत स्थापना करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिरावरील धर्मध्वजाच्या धातूच्या प्रतिकृतीसह कचनार वृक्ष, ‘ॐ’ आणि सूर्य चिन्ह असलेल्या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्याचे अध्यक्षपद रवी वाघमारे यांनी भूषवले, तर सचिव राजीव काळेले, अधिवक्ता आनंद परचुरे, नगरसेवक योगेश पाचपोर, उद्योजक उदयभास्कर नायर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजाची स्थापना पार पडली.
 
Ramnagar Ram Temple
 
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या समोर शंतनू मुळी गुरुजी यांच्या हस्ते गणेशपूजनाने झाली. त्यानंतर मंत्रोच्चारांच्या वातावरणात धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शंखनाद, ‘जय श्रीराम’च्या घोषणा आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला. Ramnagar Ram Temple यानंतर सामूहिक रामरक्षा पठण, भीमरूपी स्तोत्र, हनुमान चालीसा तसेच ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचे १०८ वेळा सामूहिक जप करण्यात आला. प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
या कार्यक्रमास मंदिराचे विश्वस्त दीपक खिरवडकर, किरण देवपूजारी, अशोक आग्रे, अशोक केदार, विनोद जोशी, दत्तात्रय खरे, मदन देशपांडे, वृषाली शिलेदार, हेमांगी अभ्यंकर यांच्यासह स्वयंसेवक आणि रामभक्त महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रा.स्व. संघाच्या रामनगर प्रभात शाखेचे सुनील कोलारकर, विवेक हुद्दार, अंकित कलकोटवार, प्रविण मुळे, हरि देशपांडे, विशाल उमाळकर, राम कुंभारे आदींची उपस्थिती होती. Ramnagar Ram Temple कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रवी वाघमारे आणि सचिव राजीव काळेले यांच्या मार्गदर्शनाखाली वृषाली शिलेदार, हेमांगी अभ्यंकर, आकाश सावरकर, ओंकार सोनटक्के, मनोज ध्रुव, यशवंत जानवे, मोहन पाटीदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: रवी वाघमारे, संपर्क मित्र