भगवान श्री परशुराम भवनाचा भव्य लोकार्पण सोहळा
बुलढाणा,
भगवान परशुराम यांच्या कार्यातून समाजाला सदैव प्रेरणा मिळत राहील महावीर नगर परिसरात उभारण्यात आलेले हे भवन अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त सभागृह व विविध सामाजिक-धार्मिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल. समाजाच्या एकतेसाठी, सांस्कृतिक जतनासाठी व पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी अशा प्रकारच्या धार्मिक व सामाजिक भवनांची उभारणी अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन Sanjay Gaikwadआ. संजय गायकवाड यांनी केले.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तसेच भगवान श्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून बुलढाणा शहरातील महावीर नगर येथे उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य भगवान श्री परशुराम भवनाचे लोकार्पण दि. १९ एप्रिल रोजी पार पडले. या भव्य सोहळ्याचे उदघाटन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्ष पुजा गायकवाड, बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, नपागटनेते मृत्युंजय गायकवाड, माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना शहर प्रमुख आशिष जाधव, बुलढाणा नगरपालिका उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, नगरसेवक मालती शेवाळे, बाळासाहेब धूड, सोहम झाल्टे, उदयदादा देशपांडे, नीलम खोत, भाजपा माजी शहर प्रमुख सिद्धार्थ शर्मा, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख मयुरी देशपांडे, आश्रुबा शेवाळे मामा, जी. टी. कुलकर्णी, अमित कुलकर्णी, उत्कर्ष ढापणे, डॉ. सुभाष जोशी, अंजली परांजपे, मेघना पेठे, अजिंय कुलकर्णी, किरण देशपांडे, विनायक जोशी, बाबा वरणगावकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रदीप कवीमंडन, विलासराव देशमुख, अशोक व्यास, संजय कुलकर्णी, अमित काळकर, गजानन कुलकर्णी, अजय काळे, अजय मिश्रा, विजय व्यवहारे, श्रेयस देशमुख, राजेंद्र विष्णुपंत महाजन, अॅड. सीमा गोपाल राजोरिया, पांडुरंग सदाशिव सावळे, अजय खोत यांच्यासह क्षत्रिय ब्राह्मण सभेचे सर्व पदाधिकारी, ब्राह्मण समाज बांधव, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाज बांधवांच्या वतीने Sanjay Gaikwad आ. संजय गायकवाड तसेच बुलढाणा नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात मान्यवरांचे स्वागत केले. या सत्कारावेळी समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. विशेषतः सामाजिक एकात्मता, धार्मिक परंपरांचे जतन आणि समाजासाठी उभारण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. मान्यवरांनीही समाजाच्या प्रेम व विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही समाजहिताचे कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प व्यक्त केला.सोहळ्या दरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक विधी, पूजन आणि सत्कार सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.