मुंबई
Shaktimaan reboot controversy भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ‘शक्तिमान’चा रिबूट प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू आहे अभिनेता मुकेश खन्ना यांचा एक मोठा दावा, ज्यामध्ये त्यांनी या प्रकल्पावरून त्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे.‘शक्तिमान’ ही 1990 च्या दशकातील सुपरहिरो मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी साकारलेली ‘शक्तिमान’ ही भूमिका आजही आयकॉनिक मानली जाते. मात्र अलीकडच्या काळात या मालिकेच्या रिबूटची चर्चा सुरू झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रोजेक्टसाठी काही मोठ्या स्टुडिओंनी आणि निर्मात्यांनी प्रयत्न केले असून, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचे नावही या भूमिकेसाठी चर्चेत आले होते. याच पार्श्वभूमीवर मुकेश खन्ना यांनी स्पष्ट भूमिका घेत रणवीर सिंगला या भूमिकेसाठी नकार दिल्याचे सांगितले जाते.त्यांच्या मते, ‘शक्तिमान’ ही केवळ एक भूमिका नसून त्यासाठी विशिष्ट प्रतिमा, व्यक्तिमत्त्व आणि साधेपणा आवश्यक आहे. एखाद्या आधीपासून ठरलेल्या इमेज असलेल्या अभिनेत्याने ही भूमिका साकारू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी रणवीर सिंगच्या अभिनय क्षमतेचे कौतुक केले असले तरी ‘शक्तिमान’साठी तो योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळेच मोठ्या Shaktimaan reboot controversy आर्थिक संधी हातातून निसटत असल्याचा दावा मुकेश खन्ना यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्टुडिओ ‘सोनी पिक्चर्स’ या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहे, मात्र कलाकार निवडीवरून मतभेद निर्माण झाल्यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यात अडथळे येत आहेत.त्यांनी असेही सांगितले की, जर ‘शक्तिमान’साठी योग्य कलाकार निवडला गेला, तर तो देशभरातून ऑडिशन्स घेऊन निवडला जाईल. त्यांच्या मते, सुपरहिरोची भूमिका केवळ प्रसिद्ध चेहऱ्याने नाही, तर योग्य व्यक्तिमत्त्वाने साकारली पाहिजे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे ‘शक्तिमान’च्या रिबूटबाबतची चर्चा अधिक तीव्र झाली असून, सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहते मूळ मालिकेच्या भावनेशी प्रामाणिक राहण्याच्या बाजूने आहेत, तर काही नव्या पिढीतील कलाकारांना संधी देण्याची मागणी करत आहेत.सध्या या प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा अंतिम निर्णय जाहीर झालेला नसून, निर्मिती प्रक्रिया आणि कलाकार निवडीबाबतचा वाद अजूनहीसुरूच आहे.