सोमलवार मा-उमिया शाखेचा दहावीला १००% निकाल

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
नागपूर.
Somalwar School Maa Umiya Branch केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) AISSE परीक्षेत सोमलवार मा-उमिया शाखेने यंदाही उज्वल यश संपादन करत गुणवत्ता यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या या परीक्षेत शाळेचा १०० टक्के निकाल लागला.शाळेतून एकूण ५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे, यापैकी ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा गौरव वाढवला आहे. आयटी (IT) विषयात तीन विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले, तर सामाजिक शास्त्र विषयात एका विद्यार्थ्याने शतप्रतिशत गुण प्राप्त केले.
 

som 
 
 
 
विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीमुळे हे यश शक्य झाले आहे. या यशाबद्दल सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश सोमलवार तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Somalwar School Maa Umiya Branch शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मावती सिंग यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि परिश्रम विद्यार्थ्यांच्या यशामागील महत्त्वाचा घटक ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
सौजन्य:सरिता कोकर्डेकर ,संपर्क मित्र