जगावर मोठे संकट! एलपीजी गॅससह तेलाचा पुरवठा खंडीत होणार

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
होर्मुज
Hormuz crisis होर्मुज खाडीबाबतच्या घडामोडींनी आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी खळबळ उडवली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी खाडी खुली असल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले. त्यानंतर झालेल्या ताज्या घडामोडींमध्ये होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याचे संकेत मिळत असून, यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Strait of Hormuz crisis, Hormuz Strait closure Iran, 
मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या अधिकाऱ्यांनी संबंधित जहाजाच्या कॅप्टनला खाडी बंद असल्याचे सांगितल्याचे समोर आले आहे. तसेच, खाडी परिसरात जाणाऱ्या जहाजांना शत्रूंसोबत सहकार्य मानले जाईल, असा इशाराही IRGC कडून देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासांत परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे दिसून येत आहे. आधी होर्मुज खाडी खुली असल्याच्या घोषणेनंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र नव्या तणावामुळे पुन्हा किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एलपीजी पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान,डोनाल्ड Hormuz crisis  ट्रम्प यांनी इराणच्या सुरुवातीच्या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले होते. मात्र नव्या घडामोडींनंतर त्यांनी इराणवर टीका करत, कोणत्याही देशाला होर्मुज खाडीच्या माध्यमातून जागतिक बाजाराला ब्लॅकमेल करू देणार नाही, असे वक्तव्य केले आहे.होर्मुज खाडी ही जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारत, चीन, पाकिस्तानसह अनेक देशांचा ऊर्जा पुरवठा या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे या तणावाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.सध्याच्या परिस्थितीत खाडी परिसरातील हालचालींवर आंतरराष्ट्रीय समुदाय बारकाईने लक्ष ठेवून असून, तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.