नवविवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला; पती फरार

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
delhi-crime : दिल्लीतील आनंद पर्वत परिसरात तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या १९ वर्षीय नवविवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत तिच्या खोलीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, महिलेच्या गळ्यावर जखमांचे निशाण दिसून आल्यामुळे तिचा गळा आवळून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
delhi
 
 
 
घटनेनंतर तिचा पती बेपत्ता झाला असून तोच या प्रकरणातील प्रमुख संशयित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे तसेच पतीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाद्वारे त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.