उंबर्डा बाजार,
Umbarda Bazaar: Rural Health Service ग्रामीण आरोग्य सेवेत महत्वपूर्ण कामगिरी करत उंबर्डा बाजार येथून जवळच असलेल्या लोणी अरब आयुष्यमान आरोग्य मंदिराला राष्ट्रीय गुणवत्ता हमी प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने वाशीम जिल्ह्यामध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय पडताळणीमध्ये या केंद्राला ९१.६६ टक्के मिळाल्याने केंद्राची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी एस. आर. नांदे यांचे मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली होती.
Umbarda Bazaar: Rural Health Service राष्ट्रीय स्तरावरून २० मार्च रोजी लोणी अरब केंद्राची तपासणी तज्ञ दिनेश गुलजार व डॉ शुभेंद्रा विक्रम सिंग यांनी पडताळणी केली. त्यामध्ये बाह्यरुग्ण सेवा, माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, प्रसुती सेवा, कुटुंब कल्याण कार्यक्रम, संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, निदान सेवा, संसर्ग नियंत्रण, आरोग्य शिक्षण, अंतर्गत व बाह्य स्वच्छता आरोग्य विषयक कार्यक्रमाची प्रचार व प्रसिद्धी औषधांची उपलब्धता सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्याची उपलब्धता, आपत्कालीन सेवा आदी सर्व १२ विभागाची कसून तपासणी केली व तपासणीमध्ये त्यांनी समाधान व्यक्त करून लोणी अरब उपकेंद्रातील डॉक्टर व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात यश प्राप्त झाले. या यशामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी अभिलाषा लकडे, डॉ. सपना जेसवाणी, केंद्राचे आरोग्य सेवक चंद्रशेखर, आरोग्य सेविका जावतकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मनभाचे सर्व आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्न केले.