...आणि तिने घेतला त्याच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताचं मृत्यू!

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
उन्नाव,
attack-case-over-dispute : उन्नावमध्ये घडलेली एक विचित्र आणि धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. एका किरकोळ वादातून एका महिलेने संतापाच्या भरात एका तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तिने त्या तरुणाला चावा घेतल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्याची तब्येत नंतर गंभीर बिघडल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
IKO
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्नाटकात आइसक्रीम विक्रीचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला असताना त्याचा गावातील एका महिलेशी वाद झाला. या वादादरम्यान महिलेने रागाच्या भरात हाताचा आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतल्याचा आरोप आहे.
 
घटनेनंतर काही दिवसांनी तो पुन्हा कामासाठी कर्नाटकात गेला. मात्र तिथे गेल्यानंतर अचानक त्याची प्रकृती खालावू लागली. परिस्थिती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्याला पुन्हा गावी आणण्याचा निर्णय घेतला. परंतु घरी परत येत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणानंतर मृताच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल करत संबंधित महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या मते, त्या घटनेमुळेच तिच्या पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असले तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपासासाठी आवश्यक नमुने जतन करण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच खरी कारणे समोर येणार आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती आणि चर्चा निर्माण झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.