- जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर
गोंदिया,
देशातील विविध भागात घडत असलेल्या VHP-Bajrang Dal's agitation असामाजिक घटनांच्या विरोधात येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने स्थानिक कुडवा चौक, गायत्री मंदिर परिसरात शनिवारी १८ एप्रिल रोजी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संबंधित घटनांवर आळा घालणे व संबंधितांवर योग्य ती कावाई करण्याच्या मागणीचे स्थानिक जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
VHP-Bajrang Dal's agitation सादर निवेदनानुसार देशाच्या विविध भागांमध्ये, विशेषतः नाशिक आणि अमरावतीसारख्या शहरांमध्ये, प्रेम प्रकरणांच्या माध्यमातून होणारी फसवणूक, जबरदस्तीने किंवा प्रलोभनाने धर्मांतर करण्याचे आरोप आणि महिला व अल्पवयीन मुलींशी घडलेल्या संवेदनशील घटना अलीकडे चर्चेत आहेत. याघटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीवरील अतिक्रमण, सामाजिक तणाव आणि कायदा व सुव्यवस्थेच्या इतर समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली. दरम्यान, संघटनेच्या वतीने शनिवारी शहरातील कुडवा चौक येथील गायत्री मंदिर परिसरात एकत्र येत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले व जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. ज्यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, सर्व प्रकरणांची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व मातृ शक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.