वर्धा,
Wardha temperature rise मागील काही दिवसांपासून राजस्थानच्या वाळवंटी भागातील कोरडे वारे विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. परिणामी, जिल्ह्याचे तापमानात वाढ होत वर्धा सुपर हॉट झाले आहे. विशेष म्हणजे सोमवार १३ ते शनिवार १८ एप्रिल या ६ दिवसांत वर्धा जिल्ह्याच्या कमाल तापमानात तब्बल २ अंश सेल्सिअसने वाढ झाली. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्याच्या तापमानाने शनिवार १८ आणि रविवार १९ एप्रिलपर्यंत मागील तीन वर्षातील विक्रम मोडले आहे. ३० एप्रिल १९९६ ला जिल्ह्याचे कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते.
Wardha temperature rise यंदा होळीनंतर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. मध्यंतरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला. नंतर सूर्याने जणू आग ओकण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली. बघता बघता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. तर दुसर्या आठवड्यात जिल्ह्याच्या तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला. तिसर्या आठवड्यात म्हणजेच सोमवार १३ रोजी जिल्ह्याचे कमाल तापमान ४३.०१ अंश सेल्सअस इतके नोंदवले गेले. मंगळवार १४ रोजी ४३.०५, बुधवार १५ रोजी ४३.९, गुरूवार १६ रोजी ४४, शुक्रवार १७ रोजी ४४.०४, शनिवार १८ आणि आज रविवार १९ रोजी जिल्ह्याचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. एकूणच वाढत्या उष्णतामानाचा जनजीवनावर परिणाम झाला असून जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना दक्ष राहून मार्गदर्शक खबरदारीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सर्वाधिक तापमान
वर्ष : नोंदवलेले सर्वाधिक तापमान
२०१६ : ४५.०० अंश सेल्सिअस
२०१७ : ४५.०२ अंश सेल्सिअस
२०१८ : ४५.०८ अंश सेल्सिअस
२०१९ : ४६.०० अंश सेल्सिअस
२०२० : ४२.०९ अंश सेल्सिअस
२०२१ : ४३.०४ अंश सेल्सिअस
२०२२ : ४५.०५ अंश सेल्सिअस
२०२३ : ४३.०० अंश सेल्सिअस
२०२४ : ४२.०५ अंश सेल्सिअस
२०२५ : ४४.०७ अंश सेल्सिअस