भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त महिलांची भव्य दुचाकी रॅली

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
women's two-wheeler rally भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त रविवारी बुलढाणा शहरातील सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने शहराच्या प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढण्यात आली. पेठेतील श्रीराम मंदिरापासून दुचाकी रॅलीची सुरुवात करण्यात आली.
 
 
rally dsk
 
women's two-wheeler rally  या रॅलीत महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी जय परशुराम, जय श्रीराम जय जय श्रीरामच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील प्रमुख रस्त्याने परिक्रमा करत नव्याने बांधण्यात आलेल्या परशुराम भवन या ठिकाणी रॅलीचा समारोप भगवान परशुरामाच्या महाआरतीने करण्यात आला.