गुजरातच्या नवसारीत ३.४ तीव्रतेचा भूकंप

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
सुरत,
3.4 magnitude earthquake in Navsari today गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून नवसारी जिल्ह्यात गुरुवारी पहाटे ही घटना घडली. सुमारे ५ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास ३.४ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. भूकंपशास्त्र संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र वांसदा परिसराच्या पूर्व-दक्षिण दिशेला सुमारे २२ किलोमीटर अंतरावर होते. सुदैवाने या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
 
 earthquake in Navsari 
 
गेल्या दहा दिवसांत राज्यात भूकंपाची ही तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी अमरेली जिल्ह्यात ३.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता, तर त्याआधी राजकोट परिसरातही सौम्य धक्के जाणवले होते. या सर्व घटनांमध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसली, तरी सततच्या धक्क्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता व्यक्त होत आहे.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमरेली भागात गेल्या काही दिवसांत वारंवार लहान-मोठे धक्के जाणवत आहेत. स्थानिक लोकांनी काही धक्के तुलनेने जास्त तीव्र असल्याचेही सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ पथक पाठवण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे.