तभा वृत्तसेवा
पुसद,
action against corporator's husband शहरातील प्रभाग क्रमांक 11 च्या नगरसेवकाच्या पतीने नगर परिषदेच्या कर्मचाèयांना अशोभनीय वक्तव्य केले आहे. सोबतच शिवीगाळदेखील केल्याचा आरोप लावला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक यांच्याकडे बुधवार, 1 एप्रिल रोजी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन पुसद शाखेच्या कर्मचाèयांनी तक्रार केली आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक रोहित पाशमवाड व आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे यांच्याशी काही कामानिमित्त नगरसेवक शिल्पा देशमुख यांचे पती सुधीर देशमुख भ्रमणध्वनीवरून बोलत होते. अशातच त्यांनी अशोभनीय भाषेत वक्तव्य करून सोबतच शिवीगाळही केली.

ही बाब असंवैधानिक व धमकी देण्यातलाच प्रकार आहे. हा माणूस नगरसेवक नसून नगरसेविकेचा पती आहे. त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे चूक आहे. तरीसुद्धा त्यांनी तसे केले आहे. परिणामी सर्व कर्मचारी व अधिकाèयांनी सुधीर देशमुख यांच्यावर शासकीय नियमानुसार उचित कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनावर अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे शहराध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, शहर सचिव, शहर कोषाध्यक्षासह इतर कर्मचा-यांनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी काय निर्णय घेणार याकडे कर्मचाèयांचे लक्ष लागले आहे.