अनेक संकेतस्थळांवर भविष्य सांगणाऱ्या जाहिरातींचा भडीमार !

- नागरिकांच्या भाेळेपणाचा घेतल्या जाताेय गैरफायदा - 200 ते 699 रुपयांत वर्तविल्या जाते भविष्य !

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
future telling advertisements अनेक जण मनगटातील ताकदीपेक्षा आपले नशिब, दैव, ग्रह-नक्षत्राचे फेरे आणि भविष्यावर जास्त विश्वास ठेवत आहेत. भविष्य जाणून घेणाऱ्यांची अचानक संख्या वाढल्यामुळे अनेक संकेतस्थळांवर भविष्य सांगणाèया जाहिरातींचा भडीमार झाला आहे. जवळपास प्रत्येक संकेतस्थळावरील जाहिरातींमध्ये 200 ते 699 रुपयांमध्ये तंताेतंत भविष्य सांगण्याचा दावा करण्यात येत आहे.
 
 

futuretelling 
 
 
‘घरात वारंवार वादविवाद हाेत आहेत का? , प्रेमात धाेका मिळाला आहे का?, प्रेमविवाह केल्यास भविष्यात टिकेल का?, हातात पैसा थांबत का नाही?, परीक्षेत पास व्हायचे आहे का?, नाेकरी मिळेल कि नाही? , यश मिळेल कि नाही?, व्यवसाय बुडेल कि तरेल?,’ याबाबत भविष्यकथन करण्याचा दावा भविष्यवेत्ते आपापल्या जाहिराती करतात.
 
इंटरनेटवर गेल्यानंतर प्रत्येक संकेतस्थळावर भविष्य वर्तविणाऱ्यां जाहिरातीचा भडीमार दिसत आहे. ‘केवळ 200 ते 699 रुपयांमध्ये बघा भविष्य’, अशी टॅगलाईन वापरून भविष्य सांगणारे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यासाठी भविष्यकथन, वास्तूसल्ला, आकड्यांचा खेळ अशा अनेक बाबींचा समावेश जाहिरातीत असताे. या जाहिरातीवर क्लिक करताच एक ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगितल्या जाते. त्यामध्ये नाव, जन्मस्थान, जन्मवेळ, माेबाईल क्रमांक, ईमेल आणि वैवाहिक स्थिती अशी माहिती भरण्यास सांगितली जाते. ही माहिती भरताच लगेच ‘क्युआर काेड’ तयार हाेऊन त्यावर 699 रुपये टाकण्यास सांगितल्या जाते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या भविष्य लिहून येते. त्यावरुन आपल्या आयुष्यात बदल करण्यास सांगितले जाते. त्यानंतर वारंवार मॅसेज, ईमेल पाठवून आपल्याला भविष्य बघण्यासाठी प्राेत्साहन दिल्या जाते. एकदा का पैसे भरले कि वारंवार पैसे भरण्यास भाग पाडण्यात येते. त्यावरुन भविष्य सांगणारा कुणी सायबर गुन्हेगार असल्याचे चित्र दिसते.
  
सायबर गुन्हेगाराचाही धाेका !
अनेकांना आपले भविष्य जाणण्याची उत्सूकता असते. त्यासाठी सुशिक्षित असलेला वर्गसुद्धा भविष्याचा मार्गी लागला आहे. टॅराे कार्ड वाचन, ज्याेतिष, हस्तरेषा, मस्तिष्करेषा वूडू, चहाच्या पानांचे वाचन अशा विविध पद्धतींने भविष्य कथक केल्या जाते. मात्र, अनेकांचे जवळपास सारखेच भविष्य असल्यामुळे ही सायबर गुन्हेगारांची नवी खेळी तर नाही, असा संशय निर्माण हाेताे.
युवा पीढी लागली भविष्यवेत्त्याच्या मागे
महिलांसह युवा पीढीसुद्धा भविष्य सांगणाऱ्यांच्या नादी लागली आहे. प्रेमात दगा मिळाल्यानंतर किंवा प्रेम नशिबात आहे की नाही, हे बघण्यासाठी युवा पीढी संकेतस्थळावर असलेल्या भविष्य सांगणाऱ्यांच्या जाहिरातीत पैसे गुंतवतात. तंताेतंत भविष्य, भविष्यातील भाकित आणि गाेपनियता असा विश्वास दिल्यामुळे अनेक विवाहित महिला आणि तरुणी भविष्य वर्तविणाऱ्या जाहिरातीच्या जाळ्यात फसत आहेत.
आपली वैयक्तिक माहिती अशा जाहिरातींमधून बाहेर जाते.future telling advertisements त्याचा दुरुपयाेग हाेण्याची शक्यता जास्त असते. भविष्य सांगणारा व्यक्ती आहे कि एखादी यंत्रणा याबाबत नेहमी संभ्रम असताे. सायबर गुन्हेगारांचीही खेळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतर्क राहूनच पैशांचा व्यवहार करावा.
- डाॅ. अर्जून माने (सायबर एक्स्पर्ट, नागपूर)