दिग्रसला भाजपाचे प्रशिक्षण महाअभियान

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस,
bjp-training-campaign : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियाना अंतर्गत येथे शनिवार व रविवार 4 व 5 एप्रिल या दोन दिवसांत भाजपा पदाधिकाèयांसह कार्यकर्त्यांच्या व्यापक संघटनात्मक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश पक्षाची विचारधारा, धोरणे आणि अंत्योदय विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच संघटनात्मक मजबुतीसाठी सक्षम कार्यकर्ते तयार करणे हा आहे.
 
 

BJP 
 
 
 
शनिवार, 4 एप्रिलला दुपारी 3 वाजता पदाधिकाèयांसह कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण व नोंदणी होईल. या कार्यशाळेचे उद्घाटक जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, प्रमुख अतिथी जिल्हा महामंत्री दत्ता राहणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत, दिग्रस विधानसभा एसआयआर प्रमुख अरुण राठोड, माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, नप नगरसेवक लक्ष्मी मेहता यांची उपस्थिती राहणार आहे.
 
 
दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षणात पक्षाचा इतिहास, विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असल्याची माहिती दिग्रस शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी दिली असून या कार्यशाळेसाठी भाजपाचे आजी माजी सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.