अनिल कांबळे,
नागपूर, 2 एप्रिल
bribery-case : कर्तव्यावर असताना घडलेल्या अपघातात कर्मचाऱ्याचा हात कापावा लागला. त्या कर्मचाèयांवर झालेल्या उपचाराचे वैद्यकीय बिल आणि सेवा लाभ परतावा (अरियर्स) मंजूर करून देण्याच्या माेबदल्यात अडीच लाखांची लाच स्विकारताना महावितरणच्या उपव्यवस्थापक व कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. उप व्यवस्थापक गणेश नथुजी डाेरले ( 51) आणि मानव संसाधन विभागाचे सुमित रेवतकर अशी लाचखाेर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. महावितरण कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारावर एसीबीच्या पथकाने हिंगणा येथे सापळा रचून गुरुवारी दुपारी ही कारवाई केली. तक्रारदार हे महावितरणच्या हिंगणा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

कर्तव्यावर असताना झालेल्या एका अपघातात त्यांचा उजवा हात कापला गेला हाेता. त्याचे मेडिकल बिल प्रलंबित हाेते. त्यांना मिळालेल्या सेवा लाभ परताव्याची (अरियर्स) ची रक्कमही थकली हाेती. या बदल्यात लाचखाेर गणेश डाेरले आणि सुमित रेवतकर या दाेघांनी अडीच लाख रुपये मागितले. ठरल्या प्रमाणे तक्रारदाराने उप व्यवस्थापक गणेश डाेरले या दाेघांना घरी बाेलावले. लाचेची रक्कम घेण्यासाठी दाेघेही तक्रारदाराच्या घरी पाेहाेचले. बैठकीत अडीच लाखांची रक्कम स्विकारताच दुसऱ्या खाेलीत बसलेल्या पथकाने छापा टाकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस अधीक्षक डाॅ. दिगंबर प्रधान, अपर पाेलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर ,पाेलिस निरीक्षक मयूर चाैरसिया, हवालदार भरत ठाकूर यांनी ही कारवाई केली.
हात कापावा लागला तरीही लाच मागितली
महावितरणच्या कर्मचाऱ्याचा कर्तव्य पार पाडत असताना अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा हात कापावा लागला. घरात एकमेव कमावता व्यक्ती अपघातात अपंग झाल्यामुळे कुटुंबावर माेठे संकट हाेते. अशा संकटात महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतील अशी त्यांना आशा हाेती. मात्र, आर्थिक संकटात सापडलेल्या अपंग कर्मचाèयाला आर्थिक मदत तर नव्हे त्यालाच अडीच लाख रुपयांची लाच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाèयाने मागितल्यामुळे विभागाची प्रतिमा डागाळली आहे. या अडीच लाखांतील काही रक्कम आणखी कुण्या अधिकाèयाला किंवा कर्मचाèयापर्यंत पाेहचणार हाेती का, याचा तपासही एसीबी करीत आहेत.