तभा वृत्तसेवा
उमरखेड,
kisan-wankhede : देवसरी येथील शेतकरी ज्योती चक्रधर देवसरकर यांच्या ऊस पिकाला आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट ओढवले होते. या प्रकरणाची दखल घेत आमदार किसन वानखेडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत अखेर संबंधित शेतकèयाला न्याय मिळवून दिला आहे.
आ. वानखेडे यांनी हे प्रकरण विधान भवनात उपस्थित केले. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही ठाम भूमिका मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. याशिवाय जिल्हाधिकारी व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाèयांशी सातत्याने संपर्क साधत त्यांनी प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
वेळप्रसंगी संबंधित अधिकाèयांना जाब विचारत त्यांनी शेतकèयाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत महावितरणकडून ज्योती देवसरकर यांना 1 लाख 65 हजार 385 रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
या मदतीमुळे संबंधित शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, परिसरात आमदार किसन वानखेडे, महावितरण अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. शेतकèयांच्या प्रश्नांप्रती आ. वानखेडे यांची बांधिलकी यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या प्रसंगी डॉ. अंकुश देवसरकर, अधीक्षक अभियंता पागृत, कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम, प्रकाश इंगोले, राजेंद्र क्षीरसागर, कपिल प्रसाद, राकेश रंजन, बालाजी वानखेडे, जगदेव देवसरकर, श्रीधर देवसरकर, परमानंद कदम, चंद्रमणी सावतकर, गजानन देवसरकर, संजय देवसरकर, पवन गिरी, डॉ. आनंद राणे, अतुल देवसरकर, संदीप देवसरकर, राजेश देवसरकर, बंडू देवसरकर, प्रदीप देवसरकर व ज्ञानेश्वर वानखेडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.