राळेगाव बजरंग दलाची मोठी कारवाई

गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडला

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
Cattle smuggling truck caught बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा धाडस दाखवत गोवंश तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. बुधवारी रात्री 11.30 च्या दरम्यान, हिंगणघाटहून राळेगावमार्गे गोवंशाने भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती राळेगाव बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली.माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तत्काळ वर्धा बायपास परिसरात सापळा रचून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे काढले. यानंतर बजरंग दल कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, हा ट्रक घाटंजीकडे जात असल्याचे लक्षात येताच जगदीश निकोडे यांनी घाटंजी येथील बजरंग दल कार्यकर्त्यांना तत्काळ सतर्क केले. सर्वांच्या समन्वयातून अखेर रात्री सुमारे 1.30 वाजता पिंपरी (बु) येथे हा ट्रक पकडण्यात यश आले.
 
 
Cattle smuggling truck caught
 
या कारवाईत सहभागी प्रमुख कार्यकर्ते या धाडसी कारवाईत बजरंग दलाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. यामध्ये जिल्हा सहसंयोजक सागर मिलमिले, प्रखंड संयोजक राहुल गायकवाड व जगदीश निकोडे, गौरक्षा प्रमुख युवराज देवकर, अजय धतकर, राजकुमार बघेल, दीपक बघेल, अनुराग देवकर, सचिन भूत, विशाल ठाकरे, संदेश गिरी आणि इतर अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
धक्कादायक वास्तव समोर
ट्रकची तपासणी करताना अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. वाहनात एकूण 20 जनावरे भरली होती. त्यापैकी 3 जनावरे मृतावस्थेत आढळली. तर अनेक जनावरे गंभीर जखमी होती. घटनेनंतर वाहन क्रमांक एमएच40 एन7592 चा चालक ट्रक सोडून फरार झाला. या प्रकरणी संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली.
धाडसाचे सर्वत्र कौतुक
राळेगाव बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे.