'धुरंधर 2’ चित्रपटावर ‘स्क्रिप्ट चोरीचा गंभीर आरोप

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
मुंबई
dhurandhar 2 अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. देशात अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 19 मार्च पासून रिलीज होताच या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. एकिकडे चित्रपट चांगले यश कमावत आहे तर दुसरीकडे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने या चित्रपटावर ‘स्क्रिप्ट चोरी’ चा गंभीर आरोप केला आहे.
 

dhurandhar 2  
नेमका आरोप काय?
कन्नड चित्रपटसृष्टीतील निर्माते आणि लेखक संतोष कुमार आर. एस. यांनी ‘धुरंधर 2’च्या कथेबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2023 साली त्यांनी तयार केलेल्या मूळ कथेशी या चित्रपटाची कथा आधारित आहे. ही कथा त्यांनी त्या वेळी विविध मोठ्या प्रॉडक्शन dhurandhar 2  हाऊसेसकडे सादर केली होती, जेणेकरून नामांकित कलाकारांसह चित्रपटाची निर्मिती करता येईल. मात्र, त्यांच्या परवानगीशिवाय आणि कोणतेही श्रेय न देता हीच कथा वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संतोष कुमार म्हणाले की, मी जेव्हा हा चित्रपट पाहिला, तेव्हा मला धक्काच बसला. चित्रपटातील अनेक दृश्ये आणि मूळ संकल्पना ही मी लिहिलेल्या स्क्रिप्टशी हुबेहूब जुळतेय. मी ही कथा नोव्हेंबर 2023 मध्ये ‘स्क्रीन राइटर्स असोसिएशन’मध्ये रीतसर नोंदणीकृत केली होती, असे त्यांनी म्हटले . संतोष कुमार यांनी आता कायदेशीर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्याकडे या स्क्रिप्टचे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स, ई-मेल्स आणि इतर पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.