उमरखेड शहरात वीज समस्या वाढली

-नागरिकांची महावितरण कार्यालयात धडक -15 दिवसांत आढावा घेण्याचे आश्वासन

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
electricity-problem : शहरातील वारंवार खंडित होणाèया वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत महावितरणच्या कार्यालयात धडक देत आपल्या समस्या मांडल्या. सर्व समस्या निराकरण समाधान ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने काही नगरसेवक व वीज समस्याग्रस्त नागरिकांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. शहरात वाढत चाललेल्या वीज समस्येचा पाढा वाचला.
 

MJK 
 
 
 
यावेळी शहरातील वीजपुरवठा खंडित होणे, वाढता लोड, अपुरी डीपी व्यवस्था, तसेच तक्रार निवारणातील अडचणी यांसारख्या विविध मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या समस्यांची तातडीने दखल घेत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन अंबाडकर यांनी दिले. येत्या 15 दिवसांनंतर पुन्हा बैठक घेऊन तक्रारींचा किती निपटारा झाला आणि आणखी कोणत्या सुधारणा करता येतील, यावर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
महत्वाचे म्हणजे, शहरातील प्रत्येक वॉर्डनुसार व डीपीनुसार संबंधित कर्मचाèयांची नावे व त्यांचे दूरध्वनी क्रमांक नागरिकांना देण्यात येणार असून, वीज ग्राहकांशी सुसंवाद ठेवण्याच्या स्पष्ट सूचना कर्मचाèयांना देण्यात येणार आहेत. याशिवाय, शहरासाठी मंजूर झालेल्या डीपींच्या कामासाठी आवश्यक निधी लवकर मिळावा यासाठी वरिष्ठ अधिकाèयांकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच या संदर्भात आमदार किसन वानखेडे यांच्याकडेही निधीसाठी उच्चस्तर पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 
 
या चर्चासत्रात नगर परिषदेचे सहा नगरसेवक तसेच शहरातील अनेक वीज समस्याग्रस्त नागरिक उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. शेवटी, नागरिकांनी असेच सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन करत, सर्वांनी एकत्र येऊनच आपल्या समस्या सोडवू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.