गडचिरोली,
gadchiroli-district-central-cooperative-bank : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026 ते 2031 या पंचवार्षीक कालावधीकरीता 21 संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्व 21 ही संचालक हे अविरोध निवडून आले आहेत.
या निवडणुकीकरीता 9 मार्चपासुन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते, अशा पात्र उमेदवारांची 17 मार्चला विधीग्राह्य उमेदवारांची सुची प्रसिध्द करण्यात आलेली होती. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतीम तारीख 1 एप्रिल होती. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या तारखेपर्यंत 3 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे प्रत्येक मतदार संघातील एक जागा भरण्यासाठी एकाच उमेदवाराचे नाव कायम असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेनंतर बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे बँकेच्या एकुण 21 संचालकांपैकी सर्व 21 संचालक हे अविरोध निवडुन आले असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल यांनी जाहीर केले आहे.
सेवा/आविका सहकारी संस्थेचे संचालक म्हणून गडचिरोली तालुक्यामधून सौरभ अनिल म्हशाखेत्री, आरमोरी तालुक्यातून योगाजी गोपाळा फटाले, देसाईगंज तालुका खिळसागर यादवराव नाकाडे, कोरची तालुका श्रीकांत व्यंकटी नागीलवार, धानोरा तालुका गजानन मनोहरराव साळवे, चामोर्शी तालुका गंगाधर जागेश्वर गण्यारपवार, अहेरी तालुका गोकुलदास कर्णाजी भट, एटापल्ली-भामरागड तालुका सुनिल शंकर तेलकुंटलवार, सिरोंचा तालुका प्रणीता नागेंद्रकुमार चिटकेशी, शेतीमाल प्रक्रिया संस्था गटातून नेत्रा अनंतराव साळवे, कृषी पणन संस्था गटातून दिपक राजेश्वर निंबेकार, विणकर, ग्राहक व ईतर संस्था गटातून महेंद्र जनार्दन मने, मजुर व ईतर संस्था गटातून ईश्वर धर्माजी पासेवार, नागरी सहकारी बँका गटातून छाया अरविंद पोरेड्डीवार, ईतर सहकारी संस्था गटातून ईशा प्रंचित पोरेड्डीवार, वैयक्तीक भागधारक व ईतर गटातून निलीमा प्रकाश पोरेड्डीवार, अजा/अज राखीव गटातून लक्ष्मी जागोबा खेडकर, महिला राखीव गटातून नलिनी मोतीराम निकुरे, महिला राखीव गटातून निलीमा वसंतराव मेश्राम, विजा/भज/विमाप्र राखीव गटातून अमोल जागोबा खेडकर, ईमाव राखीव गटातून हिरालाल बाबुराव शेंडे हे संचालक अविरोध निवडून आले आहेत.
सदर नवनियुक्त संचालकांना निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था नागपूर विभागाचे विभागीय उपनिबंधक दिनेश चंदेल यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी प्रतिज्ञापन पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी दिनेश चंदेल यांच्यासह सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था वडसाचे सहायक निबंधक पी. के. प्रधान, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी, श्रेणी-2 सचिन बंदेलवार यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.