सेलू,
unseasonal-rain : हवामान विभागाने दिलेला अवकाळी पावसाचा इशारा अखेर खरा ठरला असून बुधवार १ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा मोठा फटका सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला असून उघड्यावर ठेवलेले धान्य पूर्णपणे भिजल्याने शेतकरी व व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
रात्री अचानक सुरू झालेल्या पावसासोबत विजांचा कडकडाट आणि वादळी वारे असल्याने बाजार समितीत साठवलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे पोत्यांमध्ये भरलेले तसेच उघड्यावर ठेवलेले गहू, हरभरा व तूर यांसारखे पीक मोठ्या प्रमाणात भिजले. सध्या बाजार समितीत रबी हंगामातील पिकांची खरेदी-विक्री जोरात सुरू असून परिसरातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. अशा परिस्थितीत अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांसह व्यापार्यांनाही फटका बसला आहे. भिजलेल्या धान्याची गुणवत्ता घसरल्याने त्याला अपेक्षित भाव मिळण्याची शयता कमी झाली आहे.
या घटनेमुळे शेतकरीवर्गात नाराजी व्यत होत असून बाजार समिती प्रशासनाने धान्य सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व व्यापार्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षाही व्यत केली जात आहे.