एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान...’

-हनुमान जन्मोत्सवाचा शहरात सर्वत्र जल्लोष -मंदिरांवर आकर्षक अशी रोशणाई -शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत -जन्मोत्सवानिमित्त मंदिरातून निघणार शोभायात्रा -शोभायात्रेत ७०च्या वर चित्ररथांचा सहभाग -पोलीस रश्मिता राव यांच्या हस्ते महाआरती

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
नागपूर,
hanuman-janmotsav : हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमाननगर, मेडीकल चौकातील राजाबाक्षा हनुमान मंदिरातून गुरुवारी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमानंतर मुख्य अतिथी पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांच्या हस्ते महाआरतीनंतर झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी शोभायात्रेचे मुख्य संयोजक अ‍ॅड. विवेक तिवारी, वेदांत तिवारी, विश्वनाथ विघ्नेश बिलसे यांनी शोभायात्रेचे संचालन केले.
 

DSC_1819 
 
 
 
यंदाच्या शोभायात्रेत यंदा ७० हून अधिक आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संदेश देणार्‍या विविध देखाव्यांचा समावेश शोभायात्रेत होता. हनुमान चालीसा पाठ करीत असलेले चित्ररथ भाविकांचे आकर्षणाचे केंद्र होते.
 
हनुमान चालीसाचे अखंड पठण
 
 
भजन-कीर्तन-सुंदरकांड, शोभायात्रा, कलश यात्रा, पूजन विधी, महायज्ञ, महाआरती आणि महाप्रसादाचेही आयोजन मंदिर प्रशासन व सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले होते. श्री हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेत संपूर्ण मार्गावर सामूहिक पठणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. दिवसभर हनुमान चालीसाचे अखंड पठण तसेच महाआरतीत मोठया संख्येने भाविक सहभागी झाले होते.
 
ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप
श्री राजाबाक्षा हनुमान मंदिरातून निघालेली ही रामबाग कॉलनी, मेडीकल चौक येथून निघाल्यानंतर विविध ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मुख्य मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मेडीकल चौकातून ही ही शोभायात्रा पुढे मार्गक्रमण करीत उंटखाना चंदननगर - क्रीडा चौक, वकील पेठ, सिरसपेठ चौक, रेशीमबाग चौक, डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर, जुनी रोड, गजानन चौक रेशिमबाग, गुरुदेवनगर चौक, तिरंगा चौक, शिवनगर, सक्करदरा चौक, आयुर्वेदिक लेआऊट, सोमवारी क्वॉर्टर्स, छोटा ताजबाग चौक रघुजी नगर, दत्तात्रेयनगर, अयोध्या नगर, सुभेदार लेआऊट, मानेवाडा सिमेंट रोड, तुकडोजीनगर, चंद्रमणी नगर, विश्वकर्मा नगर, अजनी पोलिस स्टेशन चौक, वंजारी नगर, अजनी रेल्वे कॉलनी, टीव्ही वॉर्ड चौक, राजाबाक्षा हनुमान मंदिर येथे समारोप झाला.
 
 
भक्ती आणि सेवेचा अनोखा संगम
शहरातील टेकडी रोड येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भक्ती आणि सेवेचा अनोखा संगम पाहायला मिळतो, अशी प्रतिक्रिया भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली. टेकडी रोड हनुमान मंदिर समितीच्या वतीने गुरुवारी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यात दोन ते अडीच लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात, ही आनंदाची बाब होय. युवापिढीने आपले धार्मिक उत्सव अशाप्रकारे मोठया आनंदाने साजरे करण्याची नितांत गरज आहे.
 
 
तेलंगखेडी मंदिरात श्रीरामभक्तीचा जागर
 
 
हनुमान जयंती निमित्त विश्वशांतीसाठी भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगरद्वारे तेलंगखेडी हनुमान मंदिरात श्रीरामभक्तीचा जागर करण्यात आला. जगातील परिस्थिती दूर करून विश्वशांतीसाठी यावेळी प्रार्थना करणत आली. तेलंगखेडी एक जागृत हनुमान मंदिर असून भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंदिराचे विश्वस्त उमाशंकर तिवारी यांचे उपस्थितीत मंत्रोच्चारात श्री मारुतीला मंगल अभिषेक, मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर दुबे, सुजाता काथोटे, सपना रोडी, सुजाता खंबाता, राजश्री गोरे आदींनी परिश्रम घेतले.
 
हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव
पारडी येथील भवानीनगर शिवशक्ती हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी रामचरण शिवगिरी, अमरेश्वरानंद गिरी, वासुदेवानंद गिरी, सूर्यनंदी गिरी, भगीरथी महाराज, आनंद भैरव तसेच काशी येथील सचिन्द्रनाथ महाराज यांच्यासह अनेक संतांची उपस्थिती होती. शोभायात्रा, कलश यात्रा, पूजन विधी, महायज्ञ पूर्णाहुती व महाआरती व महाप्रसाद करण्यात आले.
पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात श्रीहनुमान जन्मोत्सव
 
 
पश्चिम नागपूर नागरिक संघद्वारा संचालित रामनगर येथील पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात श्रीहनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ५.३० वाजता सुरेशबुवा खापेकर यांचे हनुमान जन्माचे कीर्तन झाले. सकाळी प्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी जश गायक राजेंद्र शर्मा यांचे संगीतमय सुंदरकांड व वितरण करण्यात आले.
 
सामूहिक संगीतमय सुंदरकांड पठण
 
 
वर्धमाननगर येथील श्रीसंकटमोचन हनुमान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुवारी सकाळी सामूहिक संगीतमय सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद वितरण व सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. जुना सुभेदार येथील शारदा चौक येथे परशू ठाकूर यांच्या पुढाकारातून सामूहिक सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
....