हावरापेठ येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Hawrapeth, Nagpur हावरापेठ येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराची आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती.दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात भजन, हरिपाठ, अभिषेक, होमहवन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव पुष्पवर्षाव, आरती व हनुमान चालीसा पठणाने साजरा झाला.या निमित्ताने दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
 
mr
 
दि. १ एप्रिल रोजी सकाळी ग्रामस्वच्छता अभियान व घटस्थापना करण्यात आली. दुपारी साईबाबा भजन मंडळाच्या वतीने भजन संध्या आयोजित करण्यात आली. सायंकाळी हरिपाठ तर रात्री भजनाचा कार्यक्रम झाला.दि. २ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता भूपाळी-भजनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.Hawrapeth, Nagpur त्यानंतर हनुमान मूर्तीचे पंचामृताने मंगलस्नान, महारुद्राभिषेक व होमहवन मंदिराचे अध्यक्ष शरद बांते व उपाध्यक्ष दिनेश बांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण गायकवाड, राजू इटनकर, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर, बंडू अहिरराव आदी उपस्थित होते.यानंतर प्रसाद व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सौजन्य:रमेश मेहर,संपर्क मित्र