समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 8 मजूरांचा मृत्यू

राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
जालना,
Jalna highway accident जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. ट्रकने महिंद्रा पिकअपला जोरात धडक दिल्याने हा भयंकर अपघात झाला. या दुर्दैवी आणि भीषण अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक महिला मजूरांचा समावेश होता. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळावर लेकरांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचे काळीज चिरले.

Jalna highway accident, Samruddhi Highway crash, 
 
 
अपघातानंतर मृतांचे मृतदेह तातडीने जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार नारायण कुचे आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट दिली आणि मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Jalna highway accident  यांनी ट्विटद्वारे या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत, मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. त्यांनी म्हटले की, "जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना आहे. "उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील या अपघाताबाबत दुःख व्यक्त करत मृतकांसाठी श्रद्धांजली अर्पण केली आणि जखमींच्या त्वरीत बरे होण्याची प्रार्थना केली. स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी थेट उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करत आहेत.
 
 

या अपघातातील मृतांची नावे
अलकाबाई दादाराव आदमाने (45) – निधोना, लक्ष्मीबाई संतोष मदन (35) – केळीगव्हाण, मीना परमेश्वर आदमाने (45) – निधोना, कांचनबाई प्रकाश आदमाने (50) – निधोना, ताराबाई गहेणाजी चौधरी (60) – केळीगव्हाण, कडूबाई रामदास मदन (55) – केळीगव्हाण, सुमनबाई कचरू आदमाने (70) – निधोना, मंगलबाई शिनगारे.जखमी झालेल्या तीन लोकांवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. या भीषण अपघातामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी गटात मोठी धास्ती पसरली आहे, तर प्रशासन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे.