अशोक खरातच्या पत्नीविरोधात लुकआऊट नोटीस

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
अहिल्यानगर,
Lookout notice against Kharat's wife शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातवर सलग गुन्हे दाखल होत आहेत. अनेक पीडित महिलांनी खरातविरुद्ध तक्रारी नोंदवल्या आहेत, तर काहींनी फसवणूक व आर्थिक व्यवहारावरील तक्रारीदेखील दिल्या आहेत. विशेष म्हणजे, अशोक खरात सावकारी व्यवसायदेखील करायचा आणि त्यात त्याची पत्नी कल्पना खरातही भागीदार होती. त्यामुळे, पत्नीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्पना खरात फरार आहे. शिर्डी पोलिसांनी तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली असून, त्यामुळे ती परदेशात पळून जाण्याच्या मार्गावर नाकेबंदी झाली आहे. शिर्डी पोलिसांच्या आदेशानुसार, देशातील सर्व विमानतळांवरून कल्पना खरातला विदेशी प्रवास करण्याची परवानगी नाही.

Kharat 
शिर्डीत अशोक खरातसह कल्पना खरातविरोधात शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारी गुन्हे दाखल आहेत. ४ एकर भूखंड खरेदी-विक्री व्यवहारात शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी याबाबत फिर्याद दिली होती. आरोप आहे की, खरात कुटुंबाने कर्ज फेडण्यासाठी पैसे घेतले आणि व्याजाने शेतकऱ्यांची जमीन बळकावली. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत अशोक खरात, कल्पना खरात, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे व अशोक तांबे यांच्यावर गुन्हा नोंदवला असून, कल्पना खरातची सुटका होऊ नये म्हणून तिला परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे.