मुंबई,
Nirmitee Sawant मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत या पुन्हा एकदा त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या तोंडी असलेली भाषा , संवादफेक आणि अस्सल गावाकडचा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात त्या गावातील एका खंबीर बाईची भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्येच त्यांच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते—घर सांभाळणारी, परिस्थितीशी झुंज देणारी आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री. विशेष म्हणजे, या भूमिकेला अधिक वास्तववादी बनवण्यासाठी निर्मिती सावंत यांनी खास मेहनत घेतली आहे.
ग्रामीण भाषेचा Nirmitee Sawant नेमका फ्लेवर, रांगडेपणा आणि बोलीभाषेतील बारकावे अचूक साधण्यासाठी त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक खास शैली निर्माण करणाऱ्या अभिनेता मकरंद अनास्पुरे यांची मदत घेतली. त्यांनी स्क्रिप्ट पाठवून त्यांच्याकडून भाषेतील शब्द, वाक्प्रचार आणि लहेजा समजून घेतला, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेला खरेपणाची जोड मिळाली.
याबद्दल निर्मिती सावंत Nirmitee Sawant म्हणतात, “ट्रेलरमध्ये दिसतंच आहे की, मी एका गावाकडच्या बाईची भूमिका साकारते. तिचं आयुष्य, तिचं जगणं हे खूप वास्तव आहे. भाषेचा आणि लहेजाचा अचूकपणा यासाठी मी मकरंद अनासपुरेशी संपर्क साधला—अर्थात दिग्दर्शकाच्या परवानगीने. मकरंद त्याच भागातला असल्यामुळे, त्याच्या मार्गदर्शनामुळे त्या बोलीचा रांगडेपणा आणि नैसर्गिकपणा मला समजला. तिथले काही शब्द कसे वापरले जातात, हे कळलं. त्यामुळे ही भूमिका अधिक खरी वाटते. अशीच जर मी ती भूमिका साकारली असती तर ‘माझ्या आणखी एक भूमिकेपैकीच’ ती राहिली असती; मात्र आता ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असे मला वाटते.”