पोहरादेवी यात्रोत्सव परिसराची प्रशासनाकडून अखेर स्वच्छता

माध्यमांनी दिलेल्या वृत्ताची घेण्यात आली दखल

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
मानोरा, 
pohradevi-yatrotsav : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवीला प्लास्टीक कचर्‍याचा विळखा या मथळ्याखाली दैनिक तरुण भारत मध्ये प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत महसूल प्रशासनाने स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमामुळे रोगराई पासून गावकरी व भाविक भक्तांना मोठा दिलासा मिळाल्याने महसूल प्रशासनाने एक चांगले पाऊल उचलल्याने स्थानिक महाराज परिवारातील सदस्यांनी महसूल प्रशासनाचे आभार मानले.
 
 
JKL
 
 
 
मागील पंधरा-वीस वर्षापासून तीर्थक्षेत्र पोहरादेवीत भाविकांचा ओढा वाढला असून, येथे येणारे भाविक भक्त वेगवेगळी नवस फेडतात. त्यामुळे येथे धूप, अगरबत्ती व नारळाच्या खच पडतो. तसेच कागद, प्लास्टिक यांचा वापर जास्त होत असल्यामुळे बंजारा काशीची स्वच्छता राखने संस्थेला जिकिरीचे होत होते. यात्रात्सोवानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. याबाबत वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या. याची दखल महसूल प्रशासनाने घेत तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील भाविक भक्तांच्या अवागमनामुळे झालेल्या कचर्‍याची साफसफाई राबवून एक चांगला उपक्रम राबविला. यात्रेत संत सेवालाल महाराज, माता जगदंबा मंदिर, तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांचे समाधी स्थळ आणि संत बामनलाल महाराज मंदिर परिसरात झालेल्या कचर्‍याची स्वच्छता केली. या उपक्रमात तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्यासह त्यांच्या कर्मचार्‍यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला.
 
 
 
या स्वच्छता अभियानात काही खाजगी आस्थापना व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी सुद्धा आपले योगदान दिले. पोहरादेवी यात्रोत्सवा पश्चात व्यापार्‍यांद्वारा टाकण्यात आलेला प्रचंड प्लॅस्टिकच्या कचर्‍यामुळे प्रदूषणात वाढ व अनेक गाई या कचर्‍यामुळे दगावल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त पत्रात प्रकाशित झालेल्या बातमीमुळे खडबडून जागे झालेल्या तालुका प्रशासनाने पोहरादेवी तीर्थक्षेत्रा समवेतच तालुयातील इतरही तीर्थक्षेत्रामध्ये प्रदूषणास कारण ठरणार्‍या ठरणारा कचरा फेकण्यात येऊ नये यासंदर्भात जनजागृती करण्याची मागणी सुद्धा या निमित्याने पुढे येत आहे.