भोंदुबाबाचा डुप्लीकेट पुण्यातील धक्कादायक प्रकार

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
पुणे
Pune case नाशिकचा भोंदुबाबा प्रकरण ताजे असताना पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं आहे. याबाबत एका महिलेनं तक्रार दिली आहे.
 

Pune case, Nashik godman scandal, sexual exploitation by godman India, 
धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला Pune case केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आता पीडितेने केला आहे. कुटुंबाची भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे महिलेने सुरुवातीला पूर्ण सत्य लपवले होते . मात्र, आरोपीकडून होणारा फोनवरचा त्रास आणि 'खरात' प्रकरणामुळे मिळालेल्या प्रेरणेतून या महिलेने आता सर्व सत्य पोलिसांना सांगितले आहे.याबाबत प्रतिक्रिया देताना पीडितेने सांगितले की, "आम्ही देवाच्या श्रद्धेने तिथे गेलो होतो, पण या माणसाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. अंगात येण्याचे थोतांड रचून तो महिलांचे शोषण करतो. आमच्या कुटुंबाला आता भीती वाटते."​तपासात असेही समोर आले आहे की, या आश्रमात महिलांच्या 'अंगात येण्याचे' प्रकार घडवून आणले जातात. महिलांमध्ये कोणती तरी वेगळी शक्ती असल्याचे भासवून, त्यांच्या मनावर ताबा मिळवला जातो आणि मग 'दोष निवारण' करण्याच्या नावाखाली नवनाथ गवळी त्यांचे शोषण करतो.
खेड पोलिसांनी गुन्हा दाखल Pune case करूनही आरोपी नवनाथ गवळी अद्याप मोकाट आहे. हे प्रकरण ​न्यायालयात असूनही आरोपी एकाही तारखेला हजर राहत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ​आरोपीच्या दहशतीमुळे पीडितेचे कुटुंब सध्या प्रचंड दडपणाखाली आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक का होत नाही? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.​