हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर रामायण चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Ramayan movie teaser चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित प्रोजेक्टपैकी एक असलेला नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. ‘रामायण’ चित्रपटाचा ‘फर्स्ट लुक’ अखेर आज हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. हा चित्रपट 2 भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग हा 2026 च्या दिवाळीत प्रसिद्ध होणार आहे तर दुसरा भाग 2027च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Ramayan movie teaser 
बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता Ramayan movie teaser रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. तर साई पल्लवी माता सीता यांची भुमिका साकारत आहे. तर केजीएफ फेम साऊथ स्टार यश हा रावणाच्या भूमिकेत आहे. तर लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे दिसणार आहे.