कारंजा लाड,
Saga Super Abacus Academy, शहरासाठी अभिमानाचा आणि प्रत्येक पालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा क्षण संभाजीनगर येथे अनुभवायला मिळाला. २९ मार्च रोजी कै. भानुदासराव चव्हाण स्मृती सभागृहात दुपारी ४ वाजता पार पडलेल्या सुपर अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्ड फंशनमध्ये कारंजा येथील सागा सुपर अबॅकस अकॅडमीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यशाचा झेंडा फडकावला. या स्पर्धेमध्ये एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
सागा सुपर अबॅकस अकॅडमीच्या संचालिका अश्विनी राहुल शेगोकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये उदंतिका वैभव गावंडे हिने प्रथम क्रमांक पटकावत कारंजाचे नाव अभिमानाने राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले तर संतोष नेमाने याने द्वितीय क्रमांक, अनय अतुलकुमार महल्ले याने चतुर्थ क्रमांक, निर्वाण नितीन इंगोले यांने पाचवा क्रमांक मिळवत उज्ज्वल कामगिरी केली. विशेष श्रेणीमध्ये स्पृहा आतिष चौधरी, रियांशा स्वप्निल इंगोले, निहित विजय पोहाने आणि श्रीरंग अभिषेक वानखडे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थी चैतन्य घुले, श्रावी शेगोकार, स्वरा हिवाळे, बुद्धांग भुसारे, ईशान शेगोकार, ओजस्वी निंगोट यांना काँग्रॅच्युलेशन ट्रॉफी देण्यात आली. या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहर्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हा क्षण शब्दांत मांडणे कठीण होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य वन विभागाचे सचिव सुजय दोडल, प्रसिद्ध उद्योजक विनोद जैन, तसेच सुपर अबॅकसचे मॅनेजिंग डायरेटर मनीष महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली.
गेल्या दोन वर्षांपासून Saga Super Abacus Academy सागा सुपर अबॅकस अकॅडमी हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी, मानसिक गणित कौशल्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने निस्वार्थ भावनेने कार्यरत आहे. संचालिका अश्विनी शेगोकार आणि व्यवस्थापक राहुल पद्माकर शेगोकार यांच्या अथक परिश्रमांचे हे यशस्वी फळ मानले जात आहे. या कार्यक्रमात संचालिका अश्विनी शेगोकार यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत नवरात्री फेस्टिवल अवॉर्ड आणि इम्पॅट वुमन अवॉर्ड या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. हा सन्मान त्यांच्या समर्पित कार्याचा जिवंत पुरावा ठरला.
कारंजा शहरातील या चिमुकल्यांनी मिळवलेले यश केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून, ते अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप ठरणार आहे. हे यश प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक शिक्षकासाठी आणि संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा सुवर्णक्षण ठरला आहे.