वाघिणीचा दुसरा बळी...
साकोली.
Sakoli tigress's second victim तालुक्यातील उमरझरी आणि परिसरात आपल्या वास्तव्याने धुमाकूळ माजविणाऱ्या नागरिकांना भयग्रस्त करणाऱ्या वाघिणीचा दुसरा बळी माया सोनवाने ठरल्या. 28 मार्च रोजी माया यांना वाघिणीने गंभीर जखमी केले होते. नागपुरात उपचार घेत असताना एक एप्रिलच्या रात्री 10.30 वाजता त्यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या मृत्यूनंतर आता नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. साकोली तालुक्यातील बांपेवाडा, उमरझरी या परिसरात एका वाघिणीने मागील पंधरा दिवसांपासून धुमाळकुळ घातला आहे. मोह फुल वेचण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा बळी घेतल्यानंतर, 28 मार्च रोजी या वाघिणीने शेतात मिरच्या तोडण्याचे काम करणाऱ्या माया सोनवाने यांच्यावर प्राणघात खाल्ला केला.
परिस्थिती गंभीर असल्याने माया यांच्यावर नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक एप्रिल रोजी रात्री त्यांचे निधन झाले. पण त्याच दिवशी सकाळी म्हणजे एक एप्रिल ला याच वाघिणीने उमरझरी जवळील आमगाव येथे छाया मुंगमोडे या महिलेवर शेतात असताना प्राणघात खाल्ला केला. त्या सुद्धा गंभीर जखमी असून नागपूर येथे उपचार घेत आहेत. चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या माया यांचे निधन झाल्याचे कळताच गावात एकच संताप उसळला. सलग तीन घटना झाल्याने समस्त संतप्त असून नागरिकांनी वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र वनविभागाने हा विषय फारसा गांभीर्याने न घेतल्याने 1 एप्रिल ची घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान माया यांच्या मृत्यू नंतर अनेक गावकरी एकत्र आले होते. वृत्त लिहेस्तोर यांचा मृतदेह उमरझरी येथे आणण्यात आलेला नव्हता. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस विभागाने मोठी कुमक तैनात केली होती.